गोरगरीब, गरजुंसाठीचा आधारवड ‘राधारंग फाउंडेशन’

गेली १५ वर्षे सिंधुदुर्गात कार्यरत

रघुनाथ आणि डॉ. अशोक सरनाईक यांनी स्थापन केली संस्था

आपले वडील पांडुरंग आणि आई राधाबाई यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्याच नावाने अमेरिकास्थित रघुनाथ आणि डॉ. अशोक सरनाईक या त्यांच्या सुपुत्रांनी सन २०१० मध्ये राधारंग फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. आज हि संस्था सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्रात गोरगरीब गरजू लोकांसाठी काम करत आहेत. या संस्थेने केलेले कार्य आणि संस्थेकडून भविष्यात होणारे कार्य या विषयी संस्थेच्या वतीने आज माहिती देण्यात आली. कुडाळ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत अरुणा सामंत, दीपक सामंत आणि प्रथमेश नाईक यांनी संस्थेच्या वाटचालीविषयी आणि उपक्रमाविषयी माहिती दिली.
राधारंग फाउंडेशन या गोरगरीब गरजू लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी आज सायंकाळी कुडाळच्या मराठा समाज सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष हेमंत खानोलकर, उपाध्यक्ष ऍड. पी. डी. देसाई, कोषाध्यक्ष सचिन सामंत, कार्यवाह पूर्वा नाईक, तसंच अरुणा सामंत, दीप्ती प्रभू, स्वाती वालावलकर, श्रीपाद देसाई, प्रथमेश नाईक, केशव भोगले, गुरुनाथ नार्वेकर, अमेय देसाई, दीपक सामंत उपस्थित होते. .
यावेळी अरुणा सामंत यांनी संस्थेची स्थापना, पूर्वेतिहास, आणि उद्देशाविष्यी माहिती दिली. वडील कै. पांडुरंग पुंडलिक सरनाईक व आई कै राधाबाई पांडुरंग सरनाईक यांचे नाव कार्य रूपाने कायम अस्तित्वात राहील यासाठी अमेरिका स्थित रघुनाथ सरनाईक आणि डॉ अशोक सरनाईक यांनी या संस्थेची २०१० साली स्थापना केली. राधाबाई नावातील राधा व पांडुरंग मधील रंग एकत्र करून या संस्थेचे राधारंग फाउंडेशन असे नामकरण करण्यात आले. हे बंधु अमेरिकेत वास्तव्यास असल्याने त्यांचे पुतणे रवींद्र (संतोष) सरनाईक, मुंबई यांनी प्रत्यक्ष कामास सुरवात केली. त्यानंतर या कार्यात त्यात त्यांची सर्व भावंडे, त्यांची मुले, नातवंडे, पंतवंडे सर्व मित्रमंडळ यांना समाविष्ट केले.
आपल्या आई वडिलांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपणास शिक्षण दिले त्याची जाणीव ठेऊन त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि आपण आज जरी साता समुद्रापार असलो तरी जननी आणि जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी समाजाची सेवा करण्याच्या उदात्त हेतूने सरनाईक बंधूनी राधारंग फाउंडेशनची स्थापना केली. रघुनाथ काकांनी डॉ. सुभाष दिघे मालवण, प्रभाकर नाईक, वेतोरे, देवदत्त परुळेकर, वेंगुर्ला, अनंत (दिपक) मधुसूदन सामंत व सौ. स्वाती रवींद्र वालावलकर यासारखे निरपेक्ष कार्य करणारे अनेक खंदे कार्यकर्ते अमेरिकेत राहून फोनवरून मिळवले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक हात आज राधारंगच्या वाटचाली मध्ये हातभार लावत आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत वेगवेगळे उपक्रम सुरु केले. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात “राधारंग फाउंडेशन” आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाची शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे. असे अरुणा सामंत यांनी सांगितले.
अनंत उर्फ दीपक सामंत यांनी संस्था राबवित असलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली. ते म्हणाले माळगाव, मालवण, परुळे येथे ३री व ४थी साठी चित्रकला स्पर्धा माळगाव हायस्कूल संगणक, बैंच डेस्क, क्रीडा साहित्य, सायकल वाटप तेंडोली हायस्कूल वाचनालय पुस्तके, क्रीडा साहित्य, बेंच डेस्क वाटप असे कार्य संस्थेने नोंदणीपूर्व काळात केले. नोंदणी नंतर नोंदणी नंतरचे वार्षिक उपक्रम गरजवंत जेष्ठ नागरीकांना मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व भोजन व्यवस्था, शेतकऱ्यांसाठी बियाणे वाटप, शेती अवजारे वाटप व दुधाळ जनावरांचे वाटप, शालेय विदयार्थ्यांसाठी कुक्कुटपालन उपक्रम, शाळांसाठी हळद व सुरण लागवड उपक्रम, होतकरु विदयार्थ्यानां आर्थिक मदत (१६ शाळांमधील एका मुलाला प्रत्येकी २००० /-), ५,१० व २९किमी हाफ मॅरेथॉन व सायक्लोथॉन, हिडन जेम्स उपक्रम, दिव्यांग मुलींसाठी आर्थिक सहाय्य (प्रतिवर्षि २ मुले), एक हात मदतीचा आजारी रुग्णांसाठी वॉटर बेड, एडजेस्टेबल कॉट, वॉकर, व्हिलचेअर, साधा बेड, यासारखे साहित्य मोफत उपलब्ध, इयत्ता ९वी साठी गणित विज्ञान शिष्यवृत्ती परीक्षा, ८वी ते १०वी विदयार्थ्यासाठी क्रीडा स्पर्धा, उच्च शिक्षण घेणाऱ्या २ मुलांसाठी आर्थिक मदत, विदयार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, जेष्ठ नागरिकांसाठी जिल्हास्तरीय अभंगवाणी स्पर्धा, विदयार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय काव्यलेखन व काव्यगायन स्पर्धा, जेष्ठ नागरिकांसाठी जीवनावश्यक साहित्य वाटप, ५वी व ८वी स्कॉलरशिप परीक्षा पारितोषिक योजना, ५वी व ८वी प्रज्ञा शोध परीक्षा पारितोषिक योजना जाहीर, आश्रमातील आजी आजोबांसाठी मदत, महिलांसाठी व मुलांसाठी कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन व बुद्धिबळ प्रशिक्षण व स्पर्धा, वालावल हायस्कूल पारितोषिक योजना (आंबेसकर कुटुंबिय), इंग्लिश वाचनालय व स्पिकिंग प्रशिक्षण देण्यात आले. या शिवाय कोविड काळात टाटा रुग्णालयाच्या माध्यमातुन जिल्ह्यातील २० रुग्णालयानां ऑक्सिजन कॉनसेंट्रेटर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
प्रथमेश नाईक यांनी राधारंग फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, आपल्या कामाची व्याप्ती वाढवण्याच्या हेतूने राधारंग फाउंडेशनने नुकतीच परुळे येथे स्वतःची जमीन घेतली आहे. या जमिनीमध्ये ‘राधारंग वाटिका’ या नावाने वास्तू उभी करण्याचा मानस आहे. या वास्तू मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्या बरोबरच टेबल टेनिस, केरम, बुद्धिबळ यासारखे indoor game, जेष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम, meditation centre करण्याचे नियोजन आहे. तसेच कबड्‌डी, हॉलीबॉल अश्या खेळांसाठी मैदाने तयार करून खेळाडू, मुले व युवकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. परिसरामध्ये विविध झाडे लावून छोटी बाग करण्यात येईल. तसेच जमिनिच्या सभोवती walking trail करण्यात येईल.
ही वाटिका पूर्णत्वास आल्यानंतर या अनुषंगाने भविष्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी आणि आपल्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढवण्यासाठी राधारंग फाउंडेशन नेहमीच प्रयत्नशील राहील, असे प्रथमेश नाईक यांनी सांगितले.

🚨 अत्यंत तातडीची विनंती – आमची झेना हरवली आहे 🚨
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.
error: Content is protected !!