रुपाली जाधव भाजपाकडून खारेपाटण जि. प. साठी इच्छुक

जिल्हा परिषद आरक्षण जाहीर होऊन खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघ ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होताच इच्छुकांची रांगच या मतदारसंघात लागली आहे. सर्वाधिक जास्त महिला उमेदवार भाजपाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून वारगाव ग्रामपंचायत च्या माजी ग्रामपंचायत सद्स्य रुपाली राजेश जाधव यांनीही जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी तयारी दर्शविली आहे. रुपाली जाधव ह्या वारगाव ग्रामपंचायत च्या माजी सदस्य असून वारगाव चे विद्यमान तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेश जाधव यांच्या पत्नी आहेत. राजेश जाधव हे कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे रुपाली जाधव यांनीसुद्धा खारेपाटण जिल्हा परिषद मतदातसंघातून निवडणूक लढविण्यासाठी तयारी दर्शविल्यामुळे या मतदारसंघात नेमकी उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!