योग शिक्षण देण्याचे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद – तृप्ती धोडमिसे

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योगशिक्षक पदविका प्रदान समारंभ

४० पदविकाधारकांना पदविका प्रदान

शरीर मनाचे आरोग्य टिकवण्यासाठी योग ही आजच्या काळाची गरज बनली आहे. या दृष्टीने योग पदविका, पदव्युत्तर योग पदवी सारख्या पदव्या घेणारे, स्वतःबरोबर पदव्युत्तर इतरांचे आरोग्य सुधारण्यास हातभार लावू शकतात. त्या दृष्टीने जनजागृती व्हावी या उद्देशाने बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून योग विषयक शिक्षणक्रम सुरू केले आहेत. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी केलं. बॅ. नाथ पै बी.एड. कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत योगशिक्षक शिक्षणक्रमाच्या पदविका प्रदान सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. या योगशिक्षक पदविका प्रधान सोहळ्यांमध्ये एकूण ४० पदविकाधारकांना पदविका प्रदान करण्यात आल्या.
मुक्त विद्यापीठाच्या विद्यापीठ गीताने व स्वागत गीताने दिप प्रज्ज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकरी तृप्ती धोडमिसे, कुडाळचे तहसीलदार विरसिंग वसावे, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, बीएड कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, केंद्र समन्वयक प्रा. नितीन बांबर्डेकर, बॅरिस्टर नाथ पै महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य कल्पना भंडारी, सीबीएसईच्या प्राचार्य चैताली बांदेकर, फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल इत्यादी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा शिव राजमुद्रा, शाल व श्रीफळ भेट देऊन सन्मान करण्यात आला. या योगशिक्षक पदविका प्रधान सोहळ्यांमध्ये एकूण ४० पदविकाधारकांना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला साजेल असा गणवेश (ब्लेझर ड्रेस) घालून प्रमाणपत्र, पदक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, शरीरशास्त्र आणि आहार शास्त्र ही योगविषयक अभ्यासक्रमाची महत्त्वाची दोन अंगी आहेत. त्यातून अभ्यास करून आपले आरोग्य चांगले रहावे या हेतूने या योग पदविका शिक्षणक्रमात प्रवेश घेत सहभाग नोंदवल्याबद्दल सर्व पदविकाधारकांचे अभिनंदन. आपण घेतलेल्या शिक्षणातून समाजऋण फेडा. समाजाला लोकशिक्षणाची गरज आहे. त्याची पूर्तता करा. बाहेरच्या गोष्टीला भूलू नका. एखादी गोष्ट दुसरा करतोय म्हणून करू नका तर ती आपल्या आवाक्यात आहे किंवा नाही, त्यासाठीची आपली क्षमता तपासा आणि नंतर त्यात आवड निर्माण करा.आणि ते आवडीने करा. यश मिळत जाईल. मग मानसिक वैफल्य येणार नाही. एखाद्या क्षेत्रात करिअर करायला जमले नाही म्हणून निराश न होता इतर क्षेत्रात स्वतःला सिद्ध करा. यशस्वी व्हाल. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा असा सल्लाही त्यांनी युवापिढीला दिला.
कुडाळचे तहसिलदार वीरसिंग वसावे म्हणाले, आपण आयुष्यभर शिकत असतो. शिकत राहिले पाहिजे. शरीर व मन स्वास्थ्यासाठी योगशिक्षण महत्त्वाचे आहे. त्याचा स्वतःच्या आयुष्यात नक्कीच उपयोग होईल. पण त्याबरोबर समाज आरोग्यासाठी उपयोग होईल. पथ्य पाणी पाळल्यास, ज्ञानाची संजीवनी घेतल्यास उज्वल भविष्यकाळाचे आपण धनी होऊ शकतो. हे लक्षात ठेवून काम करा, असे आवाहन केले.
चेअरमन उमेश गाळवणकर म्हणाले, अपयशातून खचून न जाता ध्येयापासून विचलित न होता कठोर श्रम केले तर यशस्वी होता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीम. धोडमिसे मॅडम आहेत. त्यांच्या व्यक्तीमत्त्वातून आपण हा बोध घेऊया. त्या पदविका प्रधान सोहळ्यात उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाला इतर विभागातील विद्यार्थी – शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. सुमन करंगळे -सावंत यांनी मांनले.

🚨 अत्यंत तातडीची विनंती – आमची झेना हरवली आहे 🚨
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.
error: Content is protected !!