आडवली नं. 1शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविले आयुर्वेदिक ‘निर्मल उटणे ‘जेष्ठ उद्योजक तथा समाजासेवक श्री. अरुण लाड यांचे शुभ हस्ते केले अनावरण

विद्यार्थ्यांच्या अंगी उद्योजक कौशल्यांचा विकास होऊन त्यांच्या मनात व्यवसायिक अभिरुची विकसित व्हावी या हेतूने आडवली नं 1 शाळा विविध उपक्रम राबाविते. याच उपक्रमाचा भाग म्हणून इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक उटणे निर्माण केले असून त्याच्या विक्रीचा शुभारंभ श्री. अरुण लाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. हे उटणे पूर्णतः नैसर्गिक घटकांपासून बनविले असून चंदन, मुलातांनी माती, आंबेहळद, गुलाब पाकळ्या पावडर अशा विविध घटकांच्या वापरांतून बनविले आहे. विशेष म्हणजे निर्माल्य असलेल्या गुलाबाच्या पाकळ्या वाळवून त्या पासून पावडर बनविली आहे.
निर्मल उटणे असे नामकरण करण्यात आले असून स्थानिक बाजारपेठेत याची विक्री केली जाणार आहे. यांतून मिळणारा नफा विद्यार्थी वेलफेअर फंडात जमा करून त्याचा विनियोग गरजू विद्यार्थ्यांसाठी करण्यात येईल. या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक श्री. रामचंद्र कुबल श्रीम. तनुजा तांबे श्रीम. रागिणी ठाकूर आणि वेदिका वाघाटे यांनी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी कच्चा माल निर्मिती, उत्पादन, प्रिंटिंग, पॅकिंग, विक्री आणि विपणन, डिपार्टमेंट करून कार्य केले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.





