जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे चे यश.

कणकवली/मयूर ठाकूर

वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले आहे,
शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत ही जिल्हास्तरीय स्पर्धा नुकतीच पार पडली यामध्ये 17 वर्षाखालील मुलांच्या गटाने दमदार व शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन करत जिल्ह्यात उपविजेते पद पटकावले.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेट्ये, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर, कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर, सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर, खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम, सल्लागार श्री. डी. पी. तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!