राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या यश पवारचे यश.

कणकवली/मयूर ठाकूर
नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे चा विद्यार्थी कु.यश देऊ पवार याने आपल्या तल्लक बुद्धिमत्तेने आणि चपळ चालींनी राज्यात 9 वा क्रमांक मिळवला.
बुद्धिबळ ही मेंदूची व्यायाम शाळा आहे असे मानले जाते आणि यश पवार याने व्यायाम शाळेत आपल्या विचारशक्तीला चालना देत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. त्याच शांत व संयमी खेळीने परीक्षकांची वाहवा मिळवली. या स्पर्धेच्या वैचारिक रणांगणात यशने 150 स्पर्धकांमधून 9 वा क्रमांक प्राप्त केला हा केवळ अंकांचा सन्मान नाही तर आयडियल इंग्लिश स्कूलच्या वरवडे च्या उज्वल परंपरेत भर घालणारा सुवर्णरुपी अध्याय आहे.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्षडॉ.,विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर, खजिनदार सौ. शीतल सावंत, सल्लागार डी. पी. तानावडे, मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.





