हुमरमळा (वालावल) गावच्या सखी ग्रामसंघ महीलांचा राजीनामा नाट्यावर पडदा

जिल्हा व्यवस्थापकआणि तालुका अभियान व्यवस्थापक यांची यशस्वी मध्यस्थी

गेले चार महीने प्रभाग समिती अध्यक्ष आणि हुमरमळा सखी ग्रामसंघाच्या वादात राजीनाम्या पर्यंत टोकाची भुमिका घेण्यात आली होती. अखेर सखी ग्रामसंघाच्या सभेत वरीष्ठांनी लक्ष घातल्याने या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. यासाठी जिल्हा व्यवस्थापकआणि तालुका अभियान व्यवस्थापक यांनी यशस्वी मध्यस्ती केली.
हुमरमळा वालावल गावाच्या माजी सरपंच सौ अर्चना बंगे यांनी जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांचा महीलांच्या वतीने केलेला सत्कार, सीआरपी यांना होत असलेला त्रास, तालुका व्यवस्थापक गणेश राठोड यांच्या कार्यालयात सखी ग्रामसंघाच्या महीलांनी दिलेली भेट, सखी ग्रामसंघाची हुमरमळा येथे झालेली सभा व महीला आरोग्य शिबीर यावर प्रभाग समिती अध्यक्ष यांनी केलेली ग्रुपवर आणि सभेच्या ठिकाणी केलेली वक्तव्ये यासाठी सौ बंगे यांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक उदय पाटील यांचेकडे सभेला मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. त्यानुसार श्री वालावलकर, श्री राठोड, श्री मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, ग्रामसेविका अपर्णा पाटील यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन केले होते. यावेळी सीआरपी व सखी ग्रामसंघाच्या महीलांनी घडलेली घडामोडींची सविस्तर माहिती दिली. यावर ऑक्टोबरमध्ये दोन दिवस ट्रेनिंग देऊन सखी ग्रामसंघाला किंवा सीआरपी यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही वरीष्ठ घेऊ असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी सखी ग्रामसंघाच्या अध्यक्ष श्रीम सुष्मा वालावलकर, सचिव सौ परब, सौ अर्चना बंगे, मानसी वालावलकर, दीपा गुंजकर, व जवळपास 70 महिला उपस्थित होत्या

error: Content is protected !!