कुडाळ तालुका भाजपच्या सरचिटणीसपदी शेखर उर्फ राजु गवंडे

कुडाळ तालुका सरचिटणीसपदी कुडाळ नाबरवाडी येथील युवा नेतृत्व राजु गवंडे यांची निवड भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई आणि कुडाळ तालुका भाजपा अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार केली आहे.
राजु गवंडे हे कुडाळ नाबरवाडी येथील साईकलामंच मित्र मंडळाच्या वतीने विविध उपक्रम घेत असतात. तसेच ते युवानेते म्हणून परीचित असुन कुडाळ शहरातील मोठा युवा वर्ग त्यांना मानणारा आहे. तसेच कुडाळ नगरपंचायत नगरसेविका सौ श्रेया गवंडे ह्या दोन वेळा नगरसेविका होण्याची किमया राजु गवंडे यांनी करुन दाखवली असुन सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ कार्याध्यक्ष म्हणुन ते कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे




