भारतीय जनता पार्टी खारेपाटण आयोजित व उद्योजक सतीश गुरव पुरस्कृत

खारेपाटण येथे १६ ऑगस्ट रोजी १,११,१११ रुपये रकमेच्या भव्य दही हंडीचे आयोजन
भारतीय जनता पार्टी खारेपाटण व खारेपाटण गावचे सुपुत्र युवा उद्योजक आणि सामजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांच्या सौजन्याने श्री देव कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून दी.१६ ऑगस्ट २०२५ रोजी खारेपाटण एस टी बस स्थानक येथे प्रथम सुमारे १ लाख ११ हजार १११ /- रुपये एवढ्या मोठ्या बक्षीस रकमेची व आकर्षक चषक असलेल्या भव्य दही हंडी उस्तवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक श्री सतीश गुरव यांनी दिली.
खारेपाटण एस टी बस स्थानक येथे शनिवार दी.१६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.०० नंतर या भव्य दहीहंडी उस्तवाला सुरवात होणार असून सुमारे १,११,१११ /- रुपये एवढी मोठी बक्षीस रक्कम असलेली स्पर्धेची दहीहंडी खारेपाटण मध्ये प्रथमच बांधण्यात येणार असल्याने सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड यांसह मुंबई व ठाणे येथील गोविंदा पथक या उस्त्ववात सहभागी होणार असल्याने खारेपाटण दशक्रोषितील नागरिकांसाठी ती एक प्रकारची पर्वणी ठरणार आहे.
तर या दहीहंडी उस्तावात सहभाग घेणारे गोविंदा पथक यांना विविध आकर्षक चषक व रोख रकमेची बक्षीसे देण्यात येणार असून चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ३००० /- रुपये,पाच थर करीता ४०००/- रुपये,सहा थर करीता ५००० /- रुपये तर सात थरा करीता ६००० /- रुपये बक्षीस रक्कम देण्यात येणार असून सर्व सहभागी गोविंदा पथकांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या दहीहांडी उस्तवात जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी खारेपाटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.




