नेरूर चव्हाटा हनुमान मंदिर येथे उद्या नारळ लढविणे स्पर्धा

रणझुंजार मित्र मंडळ आणि रुपेश पावसकर पुरस्कृत

रणझुंजार मित्र मंडळ आणि रुपेश पावसकर पुरस्कृत नेरुर येथे भव्य दिव्य अशी नारळ लढवणे स्पर्धा रविवार दिनांक १० ऑगस्ट रोजी नेरूर चव्हाटा हनुमान मंदिर येथे सायंकाळी ठीक चार वाजता आयोजित केली आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ५००१/- रुपये तसेच द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ३००१/- रुपये उद्योजक रुपेश पावसकर यांच्याकडून पुरस्कृत केले आहे. यासाठी जास्तीत जास्त नारळ लढविणाऱ्या स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या स्पर्धेची प्रवेश फी ही २००/- रुपये असणार आहे.तरी स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी सह भागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन रणझुंजार मित्र मंडळाच्या तसेच रुपेश पावसकर यांच्यावतीने करण्यात आले आहे. नारळ लढवणे स्पर्धेत संपर्कासाठी 9370983003 या नंबर वरती संपर्क करावा.

error: Content is protected !!