भाजप कुडाळ मंडलची जम्बो कार्यकारिणी जाहीर

महिला उपाध्यक्षपद प्रवेश करणाऱ्या महिलेसाठी राखीव

कुडाळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची पत्रकार परिषद

भारतीय जनता पार्टीची कुडाळ मंडल कार्यकारिणी आज अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी जाहीर केली. या कार्यकारिणीत एकूण ७० सदस्य असून. सगळ्या आघाड्याची मिळून ३०० सदस्यांची कार्यकारीणी होणार आहे. विशेष म्हणजे प्रवेश करणाऱ्या महिलेसाठी महिला उपाध्यक्षपद रिक्त ठेवण्यात आले आहे. तर कुडाळ शहर अध्यक्षपदी सुनील बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे. कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी आज पत्रकार परिषदेत हि माहिती दिली. तसेच भाजपच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या एक राखी देवभाऊंसाठी आणि हर घर तिरंगा अभियान साठी नियोजन पूर्ण झाले असून हे दोन्ही कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी होतील असा विश्वास श्री. वेंगुर्लेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजप कुडाळ मंडलची बैठक आज सकाळी अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाली. त्यांनतर अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी आज महालक्ष्मी सभागृहात पत्रकार परिषद घेऊन कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी रणजित देसाई, संध्या तेरसे, राजू राऊळ, मोहन सावंत, आरती पाटील, सुनील बांदेकर, रुपेश कानडे, तन्मय वालावलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी पुढील प्रमाणे कार्यकारणीतील नावे जाहीर केली, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष अजय आकेरकर, राजाराम धुरी, विजय वारंग, मंगेश प्रभू, राजा प्रभू, महिला उपाध्यक्ष प्रतिभा घावनळकर, एक पद रिक्त त्याजागी प्रवेश करणाऱ्या महिलेला संधी देणार. सरचिटणीस रुपेश कानडे आणि योगेश बेळणेकर, सरचिटणीस (एससी) भूपेश चेंदवणकर आणि चंद्रकांत वालावलकर, चिटणीस समाधान परब, प्रमोद गावडे, शेखर गवंडे, मंगेश धुरी, महिला चिटणीस प्रज्ञा राणे, आफरीन करोल, कोषाध्यक्ष प्रमोद नाईक ,एससी मोर्चा अध्यक्ष विष्णू तेंडुलकर, एसटी मोर्चा अध्यक्ष रणजीत रणसिंग, महिला मोर्चा अध्यक्ष आरती पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष तन्मय वालावलकर, किसान मोर्चा अध्यक्ष वैभव शेणई, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष जोसेफ डांटस, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजन पांचाळ, सदस्य – दाजी गोलम, सतीश गावडे, दीपक खरात, वासुदेव भोई, अमित दळवी, अजय डीचोलकर, दीपक काणेकर, प्रमोद दळवी, सचिन घावनळकर, आनंद धुरी, रावजी कदम, निलेश मिस्त्री, शेखर परब, गणेश गाड, पंढरीनाथ परब, अमोल तेली, प्रमोद गावडे, सुनील बांदेकर, अक्षय तेंडोलकर, प्रशांत तेंडोलकर, महेश भिसे, श्वेता लंगवे, श्रेया गवंडे, शिल्पा घुर्ये, ममता धुरी, माधवी प्रभू, मुक्ती परब, विशाखा कुलकर्णी, तेजस्विनी वैद्य, अक्षता खटावकर, साक्षी सावंत, स्वरा गावडे, साधना परब, सई काळप, अस्मिता शिरपुटे, सुप्रिया मठकर, ज्योती जळवी, शशांक पिंगुळकर, माधवी कानडे, संदेश मठकर, वैभव चेंदवणकर, मनोहर दळवी, सोनाली देसाई, आणि भरत गावडे. यामध्ये कुडाळ शहर अध्यक्षपदी सुनील बांदेकर यांची निवड करण्यात आली असल्याचे श्री. वेंगुर्लेकर यांनी जाहीर केले.
खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शखाली आणि त्यांच्या आदेशानुसार हि कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.
भाजपच्या वतीने दोन महत्वाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत त्याची देखील संजय वेंगुर्लेकर यांनी माहिती दिली. त्यामध्ये रक्षाबंधन सण साजरा करताना ‘एक राखी देवभाऊंसाठी’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातून एक लाख राख्या पाठवण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. प्रत्येक बूथ वरून १०० राख्या पाठवण्यात येतील. कुडाळ मंडल मधून ९ हजार राख्या पाठवण्यात येतील. त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. असे श्री. वेंगुर्लेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर १० ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत हे ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत प्रत्येक घरावरती तिरंगा फडकविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी संयोजकांची नेमणूक केली आहे. याचे नियोजन झाले असून हे अभियान सुद्धा शंभर टक्के यशस्वी होणार असा विश्वास संजय वेंगुर्लेकर यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!