मा.श्री.जयप्रकाश परब यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीच्या वतीने सत्कार.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग पदावर विराजमान झाल्याने सन्मान.
कणकवली/मयूर ठाकूर
कणकवली तालुक्यातील कासार्डे गावचे सुपुत्र,पूर्वाश्रमीचे प्राथमिक शिक्षक सन्माननीय श्री. जयप्रकाश अनंत परब हे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नुकतेच रुजू झाले आहेत.या निमित्ताने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीच्या वतीने त्यांच्या जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या भेटी दरम्यान समितीचे अध्यक्ष श्री. सुशांत मर्गज यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त करून परब साहेबांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना परब साहेबांनी "मी सदैव शिक्षकांच्या मदतीसाठी तत्पर राहीन," असे आश्वासन दिले.
या स्नेहमिलनात खालील मान्यवर उपस्थित होते:
🔹 श्री. अरुण चव्हाण – गटविकास अधिकारी, कणकवली
🔹 श्री. टोनी म्हापसेकर – शिक्षक नेते
🔹 सौ. दर्शना हुंबे – महिला आघाडी अध्यक्षा
🔹 श्री. निलेश ठाकूर – सचिव
🔹 श्री. धीरज हुंबे – जिल्हा उपाध्यक्ष
🔹 श्री. किशोर गोसावी – विभागीय उपाध्यक्ष
🔹 श्री. श्रीकृष्ण कांबळी – शिक्षक सहकारी पतपेढी संचालक
🔹 श्री. ईश्वरलाल कदम – जिल्हा संघटक
🔹 श्री. सचिन सावंत – कोषाध्यक्ष
🔹 श्री. सुभाष गावकर – कार्यालयीन चिटणीस
🔹 श्री. सुनील गावकर – नाटळ विभागीय अध्यक्ष
🔹 श्री. प्रवीण कदम – सदस्य
या प्रसंगी परब साहेबांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा सन्मान शिक्षक बांधवांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण करणारा ठरला.
— ✍🏻 माहिती व प्रसिद्धी विभाग
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवली