झाराप विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

अध्यक्षपदी बाळकृष्ण हरमलकर

प्रतिनिधी । कुडाळ : झाराप विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अध्यक्षपदी बाळकृष्ण सहदेव हरमलकर, तर उपाध्यक्षपदी तुकाराम पुंडलिक गोडे यांची निवड झाली आहे.
बिनविरोध निवड झालेले संचालक हुसेन इमाम आजगावकर, सदाशिव परशुराम आळवे , प्रदीप रघुनाथ तेंडीलकर, राजेंद्र जनार्दन शेणई वनिता वसंत कोंडूरकर, स्वाती राजेंद्र तेंडोलकर, प्रताप वासुदेव कुडाळकर, विश्वनाथ यशवंत तेंडोलकर, श्याम नारायण केतकर, नारायण दत्ताराम आडारकर, सुरेश रामा गावकर यांचा यांचा समावेश आहे.
या निवडणुकीत अनेक नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. झाराप विविध कार्यकारी सोसायटी कारभार गेली अनेक वर्ष चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सभासदांच्या हितासाठी सोसायटीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्याचा मानस नवीन संचालक मंडळाचा आहे. सोसायटी बिनविरोध प्रक्रिया कायम ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सर्व सभासदांनी प्रयत्न केल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. सोसायटीची थकबाकी कमी करून तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!