खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्य गौरवास्पद – संतोष टक्के

रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या वतीने महाविद्यालयास १०० बेंच प्रदान
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या या गावाने दशक्रोशीतील दुर्गम भागातील विध्यार्थ्यांना शिक्षणाचा राजमार्ग निर्माण केला म्हणूनच खारेपाटण विध्यालय व कॉलेज आपलं वेगळे स्थान निर्माण करु शकले. विध्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल करावे आणि या विध्यालयाशी आपली नाळ घट्ट करावी. असे उद्गारे रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे प्रेसिडेंट श्री संतोष श्रीधर टक्के यांनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटणच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्यावेळी काढले. या वेळी रोटरी क्लब ऑप वैभववाडीच्या वतीने महाविद्यालयास 100 बेंचिस प्रदान करण्यात आल्या.
या कार्याक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. कांबळे यांनी केले. प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या निर्मितीपासून संस्थेच्या योगदानाचे कौतूक केले. रोटरी क्लब ऑफ वैभववाडीने आपल्या कॉलेजची गरज लक्षात घेऊन 100 बेंचिस उपलब्ध करुन दिल्या बध्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्मा श्री प्रविण लोकरे उपस्थित होते त्यांनी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या सातत्याने मिळणा-या सहकार्या बध्दल आभार मानले. रोटरी क्लबचे सेक्रेटरी श्री संजय रावराणे, ट्रेझरर प्रशांत गुळेकर, सदस्य तेजस अंबेकर तसेच संस्था पदाधिकारी उपध्यक्ष श्री रघुनाथ राणे, सेक्रेटरी- महेश कोळसुलकर, विजय देसाई, राजेंद्र वरुणकर, मुख्याध्यापक श्री सानप सर, देसाई मॅडम, सय्यद सर व शिक्षक तसेच विध्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण