कणकवलीत फिरणाऱ्या “त्या” माथेफिरू तरुणा कडून नरडवे रोड वरील स्टॅच्यू उखडून काढण्याचा प्रकार

नग्न अवस्थेत त्या तरुणाचा कणकवलीत धुडगूस

पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची होतेय मागणी

कणकवली शहरात नरडवे रोड वर कणकवली नगरपंचायत कडून बसवण्यात आलेल्या विविध पोज मधील स्टॅच्यू पैकी योगासनाची पोज असलेला स्टॅच्यू काल कणकवलीत फिरत असलेल्या एका माथेफिरू ने उखडून काढला. काल गुरुवारी दिवसभरात कणकवली शहरात या विमनस्क स्थितीत फिरत असलेल्या तरुणा बाबत सोशल मीडियावर देखील फोटो व्हायरल झाले होते. पोलीस प्रशासनाकडून त्याची दखल घेतली गेली नव्हती. दरम्यान गुरुवारी रात्री नरडवे रोड वर बसविण्यात आलेल्या योगासन ची पोज असलेला एक स्टॅच्यू या माथेफिरू ने उचलून खांद्यावर घेतला. त्यावेळी सदर विमनस्क व्यक्ती ही नग्न अवस्थेत होती. मात्र कणकवलीत खुलेआम सुरू असलेल्या या प्रकाराबाबत मात्र पोलीस प्रशासन अनभिज्ञ होते. शहरातील काही लोकांवर या व्यक्तीने दगड मारण्याचाही प्रयत्न केला. तसेच काठी देखील हातात घेऊन फिरत होता. त्यामुळे या व्यक्तीपासून नागरिकांच्या जीविताला धोका असून त्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. तसेच कणकवली नगरपंचायत प्रशासनाकडून देखील हा उघडून काढलेला पुतळा पुन्हा बसवला जाण्याची गरज आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!