मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा सौरभकुमार अगरवाल यांना भोवली?

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून मोहन दहीकर यांची नियुक्ती
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सौरभकुमार अगरवाल यांची पुणे येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी आता ठाणे शहराचे पोलीस उप आयुक्त मोहन दहीकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज, २२ मे २०२५ रोजी या संदर्भात आदेश जारी केला आहे. दरम्यान नुकत्याच मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या सिंधुदुर्ग दौऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये झालेली हलगर्जीपणा ही सौरभकुमार अगरवाल यांना भोवल्याची देखील पोलीस दलामध्ये चर्चा आहे.
सौरभकुमार अगरवाल यांची पुणे येथे पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मोहन दहीकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नेमणूक झाली आहे.
कणकवली प्रतिनिधी