खारेपाटण येथील “बुद्धविहारात” बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

विश्व वंदनीय तथागत महाकारुनी भगवान गौतम बुद्ध यांची जयंती तथा “बुद्ध पौर्णिमा ” कार्यक्रम नुकताच खारेपाटण पंचशील नगर येथील “बुद्धविहारात” पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष श्री भरत रघुनाथ पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली उस्ताहात साजरा करण्यात आला.
पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरवात अध्यक्ष श्री भरत पाटणकर यांचे शुभहस्ते पंचशील ध्वजारोहण करून करण्यात आली. यानंतर खारेपाटण पंचशील नगर येथील डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला पंचशील विकास मंडळ मुंबई शाखेचे सरचिटणीस श्री मनोज पाटणकर व पायरी सावक संघ नडगिवे या मंडळाचे कार्यकर्ते श्री अजित पगारे यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर संघमित्रा महिला मंडळ खारेपाटणच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सौ संकिता संतोष पाटणकर व सचिव – सौ आस्था भूपेश पाटणकर यांचे शुभहस्ते बुद्ध विहारातील भ. “बुध्द” यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले.यावेळी बौधाचार्य श्री संतोष मधुकर पाटणकर यांचे मार्गदर्शनाखाली बुद्ध पौर्णिमा निमित्त सामुदायिक धम्म पूजा पाठ घेण्यात आला.यामध्ये लहान मुले – मुली,युवक – युवती व महिला पुरुष यांनी सहभाग घेतला.
यावेळी झालेल्या अभिवादन सभेत पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे माजी अध्यक्ष श्री संतोष पाटणकर,मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष श्री विनोद पाटणकर, सचिव श्री मनोज पाटणकर संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण च्या विद्यमान अध्यक्ष सौ संकिता संतोष पाटणकर व सचिव – सौ आस्था पाटणकर तसेच शालेय विद्यार्थीनी कु.सांची संतोष पाटणकर यांनी मार्गदर्शन पर आपले विचार व्यक्त केले. सायं.मुलांसाठी व महिलांसाठी विविध फनी गेम घेण्यात आले.यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष श्री संतोष तुरळकर, खजिनदार संदेश पाटणकर,सचिव भूषण गोवळकर,संदेशवाहक धीरज जुमलेकर,अमित पाटणकर महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ सायली तुरळकर,सचिव – सौ स्मिग्धा पोमेडकर,ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर,श्री अशोक पाटणकर, कार्यकारी अभियंता श्री सचिन पाटणकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पंचशील विकास मंडळाचे सचिव श्री सागर पोमेडकर यांनी मांनले.

error: Content is protected !!