चिंचवली गुरववाडी येथील सामाजिक सभागृहाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उदघाट्न संपन्न

चिंचवली गुरववाडी येथे आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रम सन 2022-23 अंतर्गत बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचा उदघाट्न सोहळा नुकताच पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला.चिंचवली गुरववाडी येथील सामाजिक सभागृहासाठी सरपंच रुंजी भालेकर यांनी मागणी केली होती.व यांचा वारंवार पाठपुरावा भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी केला होता. व या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले. या सभागृहासाठी आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रम अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला. व या सभागृहाचे काम पुर्ण झाले.या कामाबद्दल सर्व वाडीतील ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले.या सभागृहासाठी दिलीप विष्णू गुरव व राजेंद्र विष्णू गुरव यांनी आपल्या आई -वडिलांच्या स्मरणार्थ सभागृहासाठी संस्थेला विनामूल्य जागा उपलब्ध करून दिल्याने त्यांचे ही आभार मानण्यात आले.या सभागृहाचे उदघाट्न नुकतेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष -दिलीप तळेकर, माजी सभापती -रवींद्र जठार,भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख -सूर्यकांत भालेकर,खारेपाटण सरपंच -प्राची इस्वलकर, शेर्पे सरपंच -स्मिता पांचाळ, खारेपाटण उपसरपंच -महेंद्र गुरव, कुरंगवणे सरपंच -पप्पू ब्रह्मदंडे,चिंचवली माजी सरपंच रुंजी भालेकर, माजी उपसरपंच श्रीकृष्ण भालेकर,अनिल पेडणेकर,उपसरपंच राजेंद्र पेडणेकर, चिंचवली पोलीस पाटील -दिगंबर भालेकर,मंडळाचे अध्यक्ष संतोष गुरव,दीपक गुरव,दिलीप गुरव,तुकाराम गुरव,बूथ अध्यक्ष रवींद्र गुरव,सुनील भालेकर, सुरेश गुरव,श्रीकांत भालेकर,उपसरपंच श्रीकृष्ण भालेकर मंडळाचे अध्यक्ष संतोष गुरव दीपक गुरव दिलीप गुरव तुकाराम गुरव बथ अध्यक्ष रवींद्र गुरव सुनील भालेकर सुरेश गुरव श्रीकांत भालेकर,कृष्ण गुरव, रघुवीर भालेकर,भिकाजी सुतार, योगेश गुरव रमेश गुरव,मधुकर बांदिवडेकर,माजी पं. समिती सदस्या -तृप्ती माळवदे, किशोर माळवदे आदि ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होत्या.