सावडाव विनयभंग प्रकरणाचे ओरोसे येथे बॅनर चर्चेत

वकिलांना बॅनर द्वारे करण्यात आले आहे वकीलपत्र न घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग महिला मंचाच्या नावाने लावले आहेत बॅनर
सावडाव येथील माहितीच्या अधिकाराच्या कार्यकर्त्या नयना सावंत, वैभव सावंत यांना मारहाण झालेल्या प्रकरणानंतर संशयित आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. त्याचे पडसाद आता सिंधुदुर्गात उमटू लागले असून, या प्रकरणात विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे संशयित आरोपी हे अटकपूर्व जामीनासाठी जाणार असल्याने या प्रकरणात सिंधुदुर्ग महिला मंच च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलाना आवाहन करणारे बॅनर सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहेत. महिलेला विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या आरोपींचे वकीलपत्र वकील साहेब यांनी घेऊ नये, जेणेकरून सिंधुदुर्गातील महिलांवर असा प्रसंग येऊ नये असे आवाहन करणारे बॅनर ओरोस येथे लावण्यात आले आहेत. या बॅनरवर नयना सावंत यांना मारहाण झालेल्या चे फोटो लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी या बॅनरमुळे प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू होऊ लागली आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.





