सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी कलमठ गावाला दिली भेट

ग्रामपंचायत कार्यालय, शाळा अंगणवाडी केली पाहणी

ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले कौतुक

शाळेतील विद्यार्थ्यां समवेत साधला संवाद

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर हे महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसीय उपक्रमाचे निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध कार्यालयांना सरप्राईज भेट देत असतानाच आज संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत कणकवली तालुक्यातील कलमठ गावाला भेट दिली. गावातील विविध योजनांचा आढावा घेत असताना स्वच्छता, आरोग्य ,शिक्षण, पाणी स्त्रोत, कचरा व्यवस्थापन ,सांडपाणी व्यवस्थापन व इतर बाबींवर आढावा घेत चर्चा करून महत्त्वपूर्ण सूचना कलमात ग्रामपंचायतीला केल्या. कलमठ ग्रामपंचायतच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेत उपक्रमांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच संदीप मिस्त्री ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक विहिरी, वॉटर एटीएम ,समर कॅम्प, सॅनिटरी पॅड एटीएम ,गावातील शाळांना बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे, शाळांना वायफाय सुविधा, घरकुल योजना, ग्रामपंचायत आयएओ नामांकन , कचरा संकलन याविषयी माहिती दिली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मार्गदर्शन करत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. त्यानंतर कलमठ बाजारपेठ शाळेला भेट दिली शाळेमधील सोयी सुविधांचा आढावा घेतला, शाळेतील परसबाग शौचालय ,विज्ञान शाळा, प्लास्टिक घर, कंपोस्ट खत युनिट, वायफाय व सीसीटीव्ही ,अंगणवाडी , शालेय उपक्रमांची माहिती घेत संगणक कक्षाची पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल शाळेचे अभिनंदन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या समवेत जिल्हा समाज कल्याण अधिकारी ए एम परब, सरपंच संदिप मेस्त्री, शिक्षणाधिकारी गणपती कमळकर,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, गटशिक्षणाधिकारी गवस, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, आरोग्य सेवक चंद्रमणी कदम, महेश आचरेकर, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र यादव, नितीन पवार, दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर, सचिन खोचरे, मुख्याध्यापक मधुरा सावंत, प्रमोद पवार, इंदू डगरे कलमठ गावातील आशा सेविका व अंगणवाडी सेविका उपस्थित होते, सरपंच संदिप मेस्त्री यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी खेबुडकर यांचे वह्या भेट देऊन स्वागत केले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!