खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रीडा महाकुंभ सोहळा

विविध स्पर्धांच्या निमित्ताने बक्षीसांची होणार खैरात
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे भव्य क्रीडा महोत्सव, क्रीडा महाकुंभ भरवण्यात येणार आहे. मतदारसंघातील विविध क्रीडापटू क्रीडारसिक यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. 8 व 9 एप्रिल 2025 रोजी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात खुल्या बॅडमिंटन स्पर्धा 8 व 9 एप्रिल 2025 रोजी नगरपंचायत बॅडमिंटन कोर्ट कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 1 ओपन सिंगल प्रथम बक्षिस 5000 व द्वितीय बक्षिस 3000, ओपन डबल- प्रथम बक्षिस 10000 व द्वितीय बक्षिस 7000, 40 वर्षाच्यावरील डबल प्रथम बक्षिस 10000 व द्वितीय बक्षिस 7000, महिला सिंगल प्रथम बक्षिस 5000 व द्वितीय बक्षिस 3000, 17 वर्षाच्या खालील सिंगल प्रथम बक्षिस 5000 व द्वितीय बक्षिस 3000 तसेच ट्रॉफी 5 विजेते, 5 रनर-अप, 4 डबल तरी यात स्पर्धेत सर्व खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन संदेश उर्फ गोट्या सावंत, समीर नलावडे, मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, संदीप मेस्त्री,अण्णा कोदे यांनी केले आहे. या स्पर्धेच्या संपर्कासाठी सोम गांगण 7757902424 आणि मनिष कर्पे यांच्याशी संपर्क करावा.यात सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र आणि टी शर्ट देण्यात येईल.