कणकवली खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दशावतारी नाट्य महोत्सव

माजी नगराध्यक्ष गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळ व छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाचे आयोजन
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जि. प. चे माजी अध्यक्ष गोट्या सावंत व कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळ तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दशावतारी नाट्य महोत्सव चे आयोजन 5 ते 10 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे करण्यात आले आहे. या दशावतारी महोत्सवामध्ये 5 एप्रिल रोजी मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे, 6 एप्रिल ओंकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण, 7 एप्रिल देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण, 8 एप्रिल सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर, 9 एप्रिल जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ ओरस, व 10 एप्रिल अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ पाट यांची नाटके होणार आहेत. तरी या सर्व दशावतारी नाट्य महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन गोट्या सावंत, समीर नलावडे यांनी केले आहे.