फोंडाघाट बावीचे भाटले विठ्ठल रखुमाई मंदिर येथे 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह

नवसाला पावनारे भक्तांच्या हाकेला धावणारे फोंडाघाट बावीचे भाटले येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे .गेली 125 वर्षे अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जात आहे. श्री श्री श्री पंढरीनाथ उत्कर्ष मंडळ,फोंडाघाट बावीचे भाटले ,ता.कणकवली यांच्या वतीने 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2025 रोजी सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.दरदिवशी स्थानिक मंडळांची भजने,हरिपाठ, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री श्री श्री पंढरीनाथ उत्कर्ष मंडळ,फोंडाघाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.