साकेडी ग्रामपंचायत सदस्य समीक्षा परब अपात्र

युवासेना विभागप्रमुख किरण वर्दम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार

बिनविरोध निवडून आल्यानंतर निवडणूक खर्च सादर न केल्याचा ठपका

अर्जदार च्या वतीने ॲड. विलास परब यांचा युक्तिवाद

कणकवली तालुक्यातील साकेडी ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 3 च्या महिला सदस्य समीक्षा संतोष परब यांनी निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्यानंतर विहित कालावधीत निवडणूक खर्च सादर न केल्याबद्दल त्यांना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अपात्र केले आहे. याबाबत अर्जदार किरण वर्दम यांच्या वतीने ॲड . विलास परब यांनी युक्तिवाद केला. याबाबत ठाकरे गटाचे युवासेना विभागप्रमुख किरण सुरेश वर्दम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 ब (१) नुसार तक्रार दाखल केली होती. याचा तक्रारीनुसार या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणी दोन्ही बाजू ऐकून घेत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 ब (१) नुसार समीक्षा संतोष परब यांना अपात्र ठरविण्यात आले. समीक्षा संतोष परब या प्रभाग क्रमांक 3 मधून स्त्री सर्वसाधारण या पदावरून शिवसेना ठाकरे गटाकडून बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. दरम्यान यानंतर विविध कालावधीमध्ये निवडणूक खर्च सादर न केल्याबद्दल त्यांच्या विरोधात किरण वर्दम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार हा निर्णय देण्यात आला. त्यामुळे साकेडी ग्रामपंचायत मध्ये भाजपला हा धक्का मानला जात आहे.

error: Content is protected !!