परमहंस भालचंद्र महाराज जन्मोत्सवा निमित्त दीपोत्सव व रील स्पर्धेचे आयोजन

16 ते 20 जानेवारी या कालावधीत होणार स्पर्धा
भालचंद्र महाराज संस्थान व नमो भालचंद्र ग्रुप च्या वतीने आयोजन
परमहंस भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त, कणकवलीकरांच्या मनात नेहमीच उस्तुकता निर्माण करणारी दीपोत्सव स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे. भालचंद्र महाराज संस्थान व नमो भालचंद्राय ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने १६ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत ही भव्य स्पर्धा आयोजित गेली आहे. भालचंद्र महाराजांची पालखी ज्या मार्गांवरून जाणार आहे, त्या परिसरातील नागरिकांसाठी खास घर सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन हा सोहळा अधिक मंगलमय करण्यासाठी आपली भूमिका निभवावी, ही विनंती. अधिक माहितीसाठी संपर्क करा: उमेश वाळके – 9420209600
तसेच भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त रील स्पर्धा चे आयोजन देखील करण्यात आले आहे. नमो भालचंद्राय ग्रुपच्या वतीने परमहंस भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेद्वारे उत्सवातील सौंदर्य, श्रद्धा आणि आनंद व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेचे स्वरूप व नियम: रीलचा कालावधी, रीलची लांबी ३० ते ९० सेकंद असावी. रीलमध्ये समाविष्ट करावयाच्या बाबी:
- उत्सव सोहळ्यातील विविध कार्यक्रम, समाधी सजावट, काकड आरती, धार्मिक कार्यक्रम, जन्मोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद, आरती इत्यादी. दीपोत्सव स्पर्धेनिमित्त घरातील तसेच कणकवली शहरातील केलेली आकर्षक सजावट. दीपोत्सवाची झलक, भालचंद्र महाराज यांच्या जीवनाशी संबंधित कोणताही हृदयस्पर्शी आणि रचनात्मक क्षण.रील सादरीकरण: तयार केलेली रील नमो भालचंद्राय या संस्थानच्या इन्स्टाग्राम पेजवर “collab”* करणे अनिवार्य आहे. पेज ची लिंक https://www.instagram.com/namobhalchandray?utm_source=qr&igsh=aXhsMG9uMHZrc3V0
- रीलचा व्हिडिओ 9657034567 या *व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवणे बंधनकारक आहे. कालावधी:
स्पर्धा १६ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत खुली राहील. २१ जानेवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत रील स्वीकारल्या जातील. निवड प्रक्रिया: उत्कृष्टतेसाठी निवड करण्यात येणाऱ्या रील्समध्ये सर्जनशीलता, गुणवत्ता, उत्सवाचे योग्य प्रतिबिंब, तसेच रीलच्या माध्यमातून दिलेला संदेश यांचा विचार केला जाईल. बक्षिसे: प्रथम क्रमांक : *रु ३०००, (श्री संतोष पुजारे यांजकडून),द्वितीय क्रमांक : *रु २०००, (श्री चारूदत्त साटम यांजकडून), तृतीय क्रमांक : *रु १०००, (श्री विनू महाडिक यांजकडून), गुरुवार दि २३ जानेवारी रोजी सायंकाळची आरती झाल्यावर संस्थान मध्ये विजेत्यांना बक्षिसे दिली जातील. इतर महत्त्वाच्या सूचना: स्पर्धकाने रील स्वतः तयार करणे आवश्यक आहे. इतर कुठल्याही सामग्रीचे कॉपीराइट उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. इन्स्टाग्राम पेजवर रील “collab” न केल्यास स्पर्धेत सहभाग ग्राह्य धरला जाणार नाही. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.परमहंस भालचंद्र महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपल्या कलात्मकतेने व श्रद्धेने सजलेली रील तयार करा आणि या सोहळ्याचा एक भाग बनून अनोख्या प्रकारे महाराजांच्या चरणी नमन करा. अधिक माहितीसाठी किंवा शंका निरसनासाठी, उमेश वाळके 9420209600, संदेश पावसकर 9657034567, तन्मय नार्वेकर 7745094950, - या क्रमांकावर संपर्क साधावा.