कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सोमवारी महत्वाची बैठक

माजी आमदार वैभव नाईक यांची असणार प्रमुख उपस्थिती

     कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक  सोमवार दिनांक ०२/१२/२०२४ रोजी सकाळी ठिक  ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल क्रमांक २ येथे होणार आहे. माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हा संघटक श्रेया परब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
    तरी या बैठकीस सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी,शिवसेना  सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व शिवसैनिकांनी सोमवारी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, महीला आघाडी तालुका प्रमुख स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, कुडाळ महीला शहर प्रमुख मेघा सुकी यांनी केले आहे.
error: Content is protected !!