हुंबरट येथे श्री पावणादेवीचा १ डिसेंबर रोजी जत्रोत्सव

हुंबरट येथील हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या श्री पावणादेवीचा दि. १ डिसेंबर रोजी जत्रोत्सव होणार असून सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देव बाणकीलिंग पावणादेवी न्यास, हुंबरट ग्रामविकास मंडळ, मुंबईच्या वतीने करण्यात आले आहे.

         हुंबरट येथील श्री पावणादेवीचा जत्रा ही प्रसिद्ध असून दिवजांची जत्रा म्हणून ही जत्रा ओळखली जाते. या जत्रोत्सवात सकाळपासून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जत्रोत्सवात केले जाते. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत देवांचे डाळप फेरी, सायंकाळी ६ वाजता पावणादेवी मंदिरामध्ये देवांचे आगमन व स्वागत, सायंकाळी ७.३० पासुन मान्यवरांचे स्वागत व आभार प्रदर्शन, देवीची ओटी भरणे व नवस फेडणे, सायंकाळी ८ ते १० पर्यंत महाप्रसाद, रात्रौ १० वाजता पंचारत, रात्रौ १२ वाजता दशावतारी नाटक, पहाटे ५ वाजता सुवर्णाचे ताट, सकाळी कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

तरी सर्व भाविकांनी जत्रोत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन देव बाणकीलिंग पावणादेवी न्यास, हुंबरट ग्रामविकास मंडळ, मुंबई देवस्थान मानकरी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!