जागृत देवस्थान अनभवानीचा वार्षिक जत्रोत्सव 2 डिसेंबर रोजी
पाचशेर पाणी जळणाऱ्या जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या डामरे गावचे आराध्य दैवत श्री देव गांगो अनभवानी मातेचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी होत आहे. या जत्रेला मोठया प्रमाणात महाराष्ट्रातून भाविक येतं असतात. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन असणारी भवानी लोकांना अनुभव द्यायला लागली म्हणून ती अनभवानी या नावाने नावा रूपाला आली. या अनभवानी माता यात्रे दिवशी पाचशेर पाणी कोहळ्यात ओतून पेटविले जाते .
यावेळी 12 पाचचे मानकरी उपस्थित असतात. या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी देव तरंग अनभवानी मातेच्या उगम स्थानाकडे गाव स्वारी घेऊन जात असतात, त्यानंतर कानडेवाडी येथे असणाऱ्या ब्राह्मणाची भेट घेतल्यावर देव तरंग देवळात जात असतात. अशी पूर्ण प्रदक्षिणा झाल्यावर तिसऱ्या दिवशी यात्रा समाप्त होते. या यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाविकांना डामरे ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ यांच्या वतीने बबलु सावंत यांनी केले आहे.