चित्रकार किरण हणमशेठ यांच्या पोर्ट्रेट डेमोचे कलारसिकांवर गारुड

अवघ्या दोन तासात साकारले जयवंत नाईक यांचे पोर्ट्रेट

कलारसिकांनी अनुभवले प्रत्यक्ष व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक.

निलेश जोशी । कुडाळ : समोर बसलेल्या व्यक्तीचे चित्र कॅनव्हास वर कशाप्रकारे साकारले जाते याचा याची ​दे​ही याची डोळा अनुभव चित्रकला कलावंतांनी घेतला. कुडाळ येथील चित्रकार रजनीकांत कदम यांनी चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिचित्र कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात व्यक्ती चित्रकार किरण हणमशेठ यांनी जेष्ठ आकिर्टेक्ट जयवंत नाईक उर्फ चौ यांचे व्यक्तिचित्र अवघ्या दोन तासात कॅनव्हासवर रेखाटले. अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे काम चित्रकार व पत्रकार रजनीकांत कदम यांनी केले त्याबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचे भरभरून कौतुकही केले.


कुडाळ येथील चित्रकार व पत्रकार रजनीकांत कदम यांनी श्री गणेश स्वामी आर्ट सेंटर यांच्या माध्यमातून कला महर्षी कै के. बी. कुलकर्णी यांचे शिष्य चित्रकार किरण हणमशेठ यांची व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक कार्यशाळा कुडाळ एमआयडीसी येथे आयोजित केली होती. या कार्यशाळाला चित्रकला मूर्तिकार अशा कलावंतांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी कै. बी. के. चित्रमंदीर ट्रस्टचे संचालक जयवंत नाईक उर्फ चौ, कलामहर्षि कै. के. बी. कुलकर्णी यांचे नातू शिरीष कुलकर्णी, मुंबई येथील चित्रकार अनिल कुबल, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, पी. के. सावंत पतसंस्थेचे अध्यक्ष प्रसाद रेगे, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोशिएनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, कुडाळ पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, समितीचे सचिव व नगरपंचायत गटनेते विलास कुडाळकर, तसेच इतर तहसीलदार अमोल पाठक, डाॅ. संजय सावंत, महेश परूळेकर, भाजपा शहराध्यक्ष राकेश कांदे, पत्रकार रवी गावडे, महेश सरनाईक, बाळ खडपकर, राजन नाईक, अजय सावंत, दत्तप्रसाद वालावलकर, गुरू दळवी, पद्माकर वालावलकर, काशीराम गायकवाड, कलाशिक्षक संदीप साळसकर, संदीप चिऊलकर, राजन घाडी, आजगावकर, भुषण जड्ये, समीर साखळकर तसेच कला रसिक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी येथील कलादालनाला के. बी. के. चित्रमंदीर आर्ट ट्रस्ट क्रिएशन ग्रुप मुंबई प्रेषित आर्किटेक्ट जयवंत कृष्णाजी नाईक (चौ), श्री अनिल दत्तात्रय कुबल कलादालन कुडाळ असे नामकरण शिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयवंत नाईक उर्फ चौ यांचे व्यक्तिचित्र किरण हणमशेठ यांनी अवघ्या दोन तासाच्या कालावधीत कॅनव्हास वर साकारले. हणमशेठ यांच्या कलेला यावेळी उपस्थितीतांनी दाद दिली.
यावेळी जयवंत नाईक उर्फ चौ यांनी सांगितले की, या ठिकाणी रजनीकांत कदम हे चित्रकला क्षेत्रात चांगले कार्य करीत असुन त्यांची कार्यशाळेची वास्तु अजुनही मोठी होवुन कलाकारांना या ठिकाणी सर्व कलेचे ज्ञान मिळेल असा विश्वास व्यक्त केला. प्रसाद रेगे, उमेश गाळवणकर, मोहन होडावडेकर व उमेश तोरस्कर यांनी ही मनोगत व्यक्त करताना अशा प्रकारच्या चित्रकलेचे उपक्रमांचे आयोजन केले हे कौतुकास्पद असुन अशा उपक्रम यापुढे ही व्हावेत असे सांगितले.
यावेळी रजनीकांत कदम यांनी सांगितले की, चित्रकला क्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या जिल्ह्यातील मुलांना या क्षेत्रातील विविध विषयांची माहिती प्रात्यक्षिका व मार्गदर्शनाद्वारे व्हावी यासाठी श्री गणेश स्वामी कलादालन कुडाळच्या वतीने यापुढे कार्यशाळेचें आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पहिलीच ही व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित केली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाट हायस्कूलचे कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी विशेष सहकार्य केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!