कुडाळ मध्ये १७ ला उत्कर्ष शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

एस. आर. दळवी (आय) फाऊंडेशन यांचे आयोजन

आदर्श शाळा, जीवन गौरव, रायझिंग स्टार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचे होणार वितरण

निलेश जोशी । कुडाळ : शिक्षकांनी केलेल्या सर्व सामाजिक कार्याची आणि उत्तम शैक्षणिक कामाची दखल घेऊन शिक्षकांचा सन्मान, कौतुक आणि समाजाप्रती करत असलेल्या कामगिरीसाठी एस आर दळवी (आय) फाऊंडेशन यांच्या वतीने ‘उत्कर्ष शिक्षक पुरस्कार २०२२’ याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कारसाठी निवड झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांना त्यांनी केलेल्या कार्याची पोच पावती म्हणून ‘उत्कर्ष शिक्षक पुरस्कार २०२२’, सोहळा शुक्रवारी दि. १७ मार्च २०२३ रोजी मराठा समाज हॉल कुडाळ हायस्कूल शेजारी. ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यामध्ये  “आदर्श शाळा पुरस्कार”, “जीवन गौरव पुरस्कार”, उत्कृष्ट शिक्षक, “रायझिंग स्टार”  हे पुरस्कार शिक्षकांना व शाळेला देण्यात येणार आहेत, तसेच 2022 मध्ये आयोजित केलेल्या कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार दिले जातील.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकरी महेश धोत्रे, तहसीलदार अमोल पाठक, कुडाळचे गट शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, रामचंद्र दळवी व श्रीमती. सीता दळवी – संस्थापक, एस आर दळवी (आय) फाऊंडेशन हे उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्व शिक्षकांसाठी Aditya Birla Group तर्फे श्रीमती.अल्पा शहा या ‘Financial Literacy’ या महत्वपूर्ण विषयावर सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करतील व त्याचे प्रमाणपत्रही शिक्षकांना देण्यात येईल, “Chat GPT ” या विषयावर डॉ. नयन भेडा  यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, नेहरू सायन्स सेंटर,द्वारे पूर्ण झालेल्या  ‘Digital Literacy Training Programme’ चे प्रमाणपत्रही येथे देण्यात येणार आहे.
एस आर दळवी (आय) फाउंडेशन आता महाराष्ट्रातील ‘English Communication Skill Development’ या विषयावर महत्वपूर्ण प्रशिक्षण सर्व शिक्षकांसाठी आयोजित करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या उपक्रमास शिक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन एस. आर. दळवी फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!