सह्याद्री महिला ग्रामसंघ बाव तर्फे महिला दिन उत्साहात

कुडाळ : सह्याद्री महिला ग्रामसंघ बाव, तालुका कुडाळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमांचे तसेच महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन हरित सिंधू महिला संस्थेच्या अध्यक्ष वर्षा कुडाळकर यांच्या हस्ते भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक वर्षा कुडाळकर यांनी महिला वर्गाला मार्गदर्शन करताना समाजात आता प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर असून सावित्रीबाई फुले यांनी दिलेले विचार अंगीकारून कार्य करणे आणि स्वतःचा विकास करावा असे आवाहन केले. यावेळी अनघा रांगणेकर, नीलम शिंदे, भारती घाटकर, शिल्पा शिरसाट, उपस्थित होत्या. तसेच व्यासपीठावर माजी सरपंच वर्षा गावकर, ग्रामपंचायत सदस्य सानिका परब, साक्षी परब, गौरी सामंत उपस्थित होत्या. यानिमित्त काही कर्मणुकीचे कार्यक्रम पार पडले. यामध्ये मेणबत्ती पेटविणे, चाळणीत काड्या घालणे,
बास्केटबॉल, संगीत खुर्ची, उखाणे यांचा समावेश होता.
चाळणीत काड्या घालणे :सुजाता राणे, अमिता कुबल, वैशाली परब
बास्केटबॉल : दर्शना बावकर, पूजा सावंत, अमिता कुबल
संगीत खुर्ची : विनिता परब, सानिका परब, शिल्पा चव्हाण
उखाणे : राधिका सामंत

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!