पोलिसाच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपीचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द

सरकार पक्षाच्यावतीने ॲड. विशेष सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा जोरदार युक्तिवाद
संशयित आरोपीचा अटकेचा मार्ग मोकळा
बांदा येथे घडली होती घटना
19 ऑक्टोबर 2024 रोजी सावंतवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राणे हे बांदा येथून सावंतवाडीच्या दिशेने दुचाकीने येत असताना संशयित आरोपीच्या क्रेटा कार ने त्याना हुल देऊन पुढे गेला. यादरम्यान अजून दोन दुचाकी स्वार अपघात होता होता वाचले. त्यामुळे श्री. राने यांनी या कारचालकाची खात्री करण्याकरता बांदा ग्रामपंचायत पर्यंत पाठलाग केला. व त्याला कार थांबवण्यास सांगितले. मात्र संशयित आरोपी क्रेटा चालक डॉमनिक अंतोन फर्नांडिस (राहणार सातार्डा) हा सदर कार रिव्हर्स 70 ते 80 मीटर चालवत आणून बांदेश्वर नाक्या जवळ असलेल्या वडापावच्या स्टॉलला देखील धडक दिली. या दरम्यान काही दुचाकीस्वारांना देखील किरकोळ दुखापत झाली. यावेळी राजेंद्र राणे यांनी कार थांबवण्यास सांगितले असतात त्यांना जीवे मारण्याचा उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी घालत त्यांच्या दुचाकीला क्रेटा कारची धडक दिली. व गाडीवरून चाक चढवून संशयित आरोपी तिथून पसार झाला. दरम्यान यानंतर पोलिसांनी कसून तपास करत संशयित आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता 109 नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर संशयीत आरोपीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. त्यानंतर त्याला अंतरिम जामीन दिवाळीपूर्वी मंजूर झाला होता. मात्र सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे घेत आरोपीच्या अंतरिम जामीन आदेशाला जोरदार हरकत घेतली. व संशयित आरोपीचा अंतरिम जामीन आदेश नामंजूर करावा असा युक्तिवाद केला. संशयित आरोपीकडून क्रेटा कार सह अन्य साहित्य हस्तगत करायची आहेत. तसेच सदर आरोपी हा दारू विक्रीमध्ये हिस्ट्री सीटर असल्याने त्याच्याकडे गुन्ह्याचा तपास करायचा आहे. आरोपीला काही लोकांनी पाहिलेला आहे. यासह अन्य प्रमुख मुद्द्यांवर युक्तिवाद करत संशयित आरोपीचा अटकपूर्व जामीन आदेश नामंजूर करण्याची न्यायालयाकडे गजानन तोडकरी यांनी मागणी केली. त्यामुळे संशयित आरोपीचा अटकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.





