शिंदे गटाला मोठा धक्का;पांग्रड शाखाप्रमुख रामदास मेस्त्री यांनी हाती घेतली मशाल

हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंवर खालच्या पातळीचे आरोप करणाऱ्या निलेश राणेंना उमेदवारी दिल्यानेच पक्षप्रवेश;रामदास मेस्त्री

कुडाळ-मालवण मधील जनतेने राणेंची घराणेशाही नेस्तनाबूत करावी

निलेश राणे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. आज कुडाळ तालुक्यातील पांग्रड येथील शिंदे गटाचे शाखाप्रमुख रामदास मेस्त्री यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह निलेश राणे यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाने नाराज होत पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेऊन प्रवेश केला आहे.आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.
यावेळी बोलताना रामदास मेस्त्री म्हणाले की जा निलेश राणेंनी बाळासाहेब ठाकरेंवर खालच्या पातळीचे आरोप केले त्यांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षाचे तिकीट दिले हा बाळासाहेबांचा अपमान सहन न झाल्यामुळे आणि राणेंच्या घराणेशाहीला कंटाळून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगुन राणेंची घराणेशाही कुडाळ- मालवण मधील जनतेने नेस्तानाबूत करण्याचे आव्हान देखील त्यांनी यावेळी जनतेला केले आहे
यावेळी सर्वेश मेस्त्री,विशाल मेस्त्री, महादेव मेस्त्री,राजाराम मेस्त्री,कृष्णा मर्गज या शिंदे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे
याप्रसंगी आवळेगाव उपविभागप्रमुख रामचंद्र कदम, उपशाखाप्रमुख आनंद मर्गज, गटप्रमुख सदानंद तावडे,बाळकृष्ण ठाकूर,युवासेना विभाग प्रमुख संदीप सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!