शिवसेना पक्षाकडून आमदार नितेश राणे यांना दिल्या शुभेच्छा

कणकवलीत पदाधिकाऱ्यांनी घेतली नितेश राणेंची भेट
कणकवली मतदार संघाचे आमदार व महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने भरघोस मताधिक्य घेत विजय मिळवण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर,महिला जिल्हा प्रमुख श्रीमती सरिता राऊत,तालुका अध्यक्ष श्रीमती प्रिया टेमकर,शोभा बागवे,उपजिल्हाप्रमुख श्री.एम.एम.सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख श्री.मेहुल धुमाळे,उपतालुकाप्रमुख श्री.दामू सावंत आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





