त्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांचे खारेपाटण पक्षकार्यालय येथे करण्यात आले स्वागत

खारेपाटण तालुका होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार -रवींद्र फाटक यांचे आश्वासन
खारेपाटण च्या विकासाचा बॅकलॉक लवकरच भरून काढणार-रवींद्र फाटक
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेश द्वार असणाऱ्या खारेपाटण येथील शिवसेना पक्षकार्यालयाला अगत्याने भेट दिली.त्याचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या कडून जोरदार स्वागत करण्यात आले.पक्षकार्यालयात भेट देऊन फाटक यांनी उपस्थित ग्रामस्थांशी ,स्थानिक पदाधिकारी यांच्याशी विकास कामांबाबत चर्चा संवाद साधला. खारेपाटण तालुका निर्मिती कृती समिती मार्फत आमदार रवींद्र फाटक यांना खारेपाटण तालुका व्हावा यासाठी निवेदन देण्यात आले.उपस्थितांशी संवाद साधताना फाटक म्हणाले, खारेपाटण च्या विकासाचा बॅकलोक भरून काढू व खारेपाटण तालुका निर्मिती ची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पाठपुरावा करून त्यांच्या माध्यमातून पूर्ण करू असा शब्द फाटक यांनी यावेळी दिला.तसेच खारेपाटण घोडेपाथर जेटी व काझी वाडी चव्हाटा ब्रिज कामाची माहिती घेत हा बंधारा/ब्रिज चा प्रश्न लवकरच मार्गी लावून लोकांचीअडचण सोडविण्यासाठी कायम तत्पर राहू असे देखील फाटक यांनी सांगितले.यावेळी खारेपाटण संभाजी नगर सर्व्हिस रोड, खारेपाटण घोडे पाथर सरक्षक भिंत, आणि काझी वाडी ते चव्हाटा ब्रीज कम बंधारा या कामांची माहिती घेत पाहणी करीत लवकर च सर्व कामे मार्गी लावण्यात येतील असा शब्द फाटक यांनी दिला.या प्रसंगी सरपंच प्राची इसवलकर जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, विधान सभा प्रमुख संदेश पटेल,उपतालुका प्रमुख मंगेश गुरव, ग्रा.प.सदस्य-गुरू शिंदे,सुधाकर ढेकणे,खारेपाटण तालुका कृती समिती चे अध्यक्ष-रमाकांत राऊत , संकेत शेट्ये,चिन्मय शिंदे,सुहास राऊत,सचिन शिंदे,अस्थाली पवार,ठाण्याचे नगरसेवक दीपक वेतकर,तसेच इतर सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण