कणकवली तालुक्यातील विरोधी पक्षाच्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्याचा लवकरच राजीनामा?

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या पक्षाला मोठा धक्का बसणार

महायुतीची घोषणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात राजकीय घडामोडींना वेग

सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. सिंधुदुर्गात काही राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. एकीकडे भाजपामधील इच्छुकांना तिकिटे डावलली गेल्यामुळे नाराजी नाट्य या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील काही तालुकास्तरीय पदाधिकारी येत्या काही दिवसांमध्ये तडकाफडकी राजीनामा देण्याची शक्यता आहे. या विरोधी पक्षाच्या तालुका पदाधिकाऱ्यांकडून सध्या “त्या” पक्षाच्या निवडणुकी च्या रणनीतीमध्ये तसेच उमेदवार निश्चितीमध्ये सहभाग घेतला जात असला तरी लवकरच तालुकास्तरीय पदाचा राजीनामा दिला जाणार असल्याची समजते. यापूर्वी त्याच तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातीलच असलेल्या एका जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांने देखील राजीनामा दिला होता. त्यानंतर आता या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्याच्या राजीनामा देण्याच्या भूमिकेमुळे कणकवली तालुक्यातील त्या पक्षाच्या गोटात एकच खळबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीमध्ये त्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्याकडून त्या दृष्टीने नुकतेच खाजगीत सुतोवाच करण्यात आले असून लवकरच हा राजीनामा दिल्यास, हा जिल्हा परिषद निवडणुकीच्या कालावधीत त्या पक्षाला मोठा धक्का मानला जाणार आहे. त्यामुळे आता या घडामोडी कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान येत्या काळामध्ये या यापूर्वी राजीनामा दिलेल्या व आता राजीनामा देण्याची संभावना असलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांची, नेत्यांची वाटचाल अन्य पक्षाच्या दिशेने सुरू असल्याची देखील दबक्या आवाजात चर्चा आहे.

error: Content is protected !!