किर्लोस विज्ञान केंद्राची शास्त्रीय सल्लागार समितीची सभा संपन्न

पौष्टिक अन्न सुरक्षिततेसाठी नैसर्गिक शेती करा
किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचा नैसर्गिक शेती स्तुत्य उपक्रम
पर्यावरण संरक्षणासाठी नैसर्गिक शेती उत्तम
- डॉ. राजेश ठोकळ , विस्तार शिक्षण संचालक, डॉ. बा. सा. को. कृ. वि. दापोली
किर्लोस कृषि विज्ञान केंद्राची शास्त्रीय सल्लागार समितीची सभा संपन्न झाली. संचालक, शास्त्रज्ञ, अधिकारी, प्रगतशील शेतकरी यांच्या उपस्थित संपन्न झालेल्या सभेमध्ये दुरदृष्य प्रणाली द्वारे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ यांनी मार्गदर्शन केले. किर्लोस कृषि विज्ञान केंद्राचे नैसर्गिक शेतीमध्ये उत्कृष्ट काम आहे. पौष्टिक अन्न सुरक्षिततेसाठी नैसर्गिक शेती हा चांगला मार्ग असून पर्यावरण संरक्षणासाठी नैसर्गिक शेती हा उत्तम पर्याय आहे असे ते म्हणाले. विद्यापीठाने संशोधन केलेले कृषी तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्याचे उत्कृष्ट काम चालू आहे. त्यातून शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे असे त्यांनी संबोधले. सदर सभेमध्ये अटारी पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. राजेश टी यांनी दुरदृष्य प्रणाली द्वारे मार्गदर्शन केले व केंद्राच्या नैसर्गिक शेती उपक्रमाचे कौतुक केले. किसान सारथी एक उपयोगी App असून यावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे त्यांनी आवाहन केले.
सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान किर्लोसचे उपाध्यक्ष प्रदीप सावंत यांनी मार्गदर्शन केले. रोजगार हमी योजनेमध्ये जंगल संवर्धनाची आर्थिक तरतूद असावी जेणेकरून कोकणातील जंगलांचे संवर्धन होण्यास मदत होईल. वेगवेगळे आजार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले. जनावरांसाठी गोठा महत्त्वाचा असून योजनेमधून लाभ घेताना चार ते पाच जनावरांची अट शितील करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सभेला संस्था सचिव बाबुराव रावराणे, संचालक दयानंद मालणकर उपस्थित होते. या सभेमध्ये प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ल्याचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी उपस्थित होते. त्यांनी भात व भुईमूग बियाण्याच्या विविध जातींची माहिती दिली. शेतकर्यां नी स्वतःला लागणारी बियाणे स्वतः तयार करावे असे ते म्हणाले. केंद्राच्या विविध उपक्रमांच्या प्रगती अहवालाचे सादरीकरण वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी केले. प्रगतशील शेतकरी प्रदीप सावंत, आनंद वसंत रावले, बाजीराव झेंडे, मंगेश घाडीगावकर व सौ. साक्षी गावकर यांनी शेतकरी प्रतिनिधी म्हणून सभेत सहभाग घेतला. कृषी विभागाचे कणकवली तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी पी. बी. ओहोळ, मालवण तालुका कृषी अधिकारी हुसेन आंबर्डेकर, कृषी पर्यवेक्षक दशरथ सावंत, सामाजिक वनीकरण विभागाचे दत्तगुरू पिळणकर, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी राजाराम परब, राकेश कुंभारे, मत्स्य विभागाचे अधिकारी प्रतीक महाडवाल, बहर महाकाळ, उमेद व्यवस्थापक वैभव पवार, मनोज भेयरे, अभिजीत परब, कृषि महाविद्यालय प्राध्यापक विवेक खरात, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे, शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत, विकास धामापूरकर, सुयश राणे, डॉ. केशव देसाई, प्रक्षेत्र व्यवस्थापक विवेक सावंत भोसले, संगणक तज्ञ सौ. सुमेधा तावडे खटावकर, अधिकारी मंगेश पालव, नरेंद्र सावंत व कर्मचारी उपस्थित होते. सभेच सूत्रसंचालन डॉ. विलास सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन भास्कर काजरेकर यांनी केले.





