श्री गणराज कृपा मिञ मंडळ किर्लोस गावठणवाडी यांच्या वतीने माघी गणेश जयंती उत्सव

गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी विविध कार्यक्रम
श्री गणराज कृपा मिञ मंडळ किर्लोस गावठणवाडी यांच्या वतीने गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरा होत आहे.
यानिमित्त कार्यक्रम सकाळी 10 वा गणेश मूर्ती पुजन, दुपारी 12 वा महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी 1 वा महाप्रसाद, सायं 7 वा हरकुळ बृ. कणकवली येथील महिला फुगडी, सायं 8 वा गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुधवळे यांचे भजन,व त्यानंतर महान पौराणिक दशावतार नाटक सादरकर्ते भद्रकाली दशावतार नाट्य मंडळ पेंडुर कट्टा यांचा दणदणीत नाटय प्रयोग होणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक श्री गणराज कृपा मिञ मंडळ किर्लोस गावठणवाडी यांनी केले आहे.





