कणकवली तालुक्यातील जि. प. उमेदवारांची नावे अद्याप गुलदस्त्यात

पालकमंत्र्यांकडे उशिरापर्यंत उमेदवार निश्चितीबाबत बैठकांचे सत्र

येत्या काही तासांमध्ये मोठ्या निर्णायक घडामोडींची शक्यता

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा 21 जानेवारी हा अंतिम दिवस आहे. अनेक जण इच्छुक असूनही आतापर्यंत कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. आज व उद्या कणकवलीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी होणार आहे. पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असून, यात उमेदवारी न मिळालेले काहीजण नाराज झाल्याची देखील चर्चा आहे. परंतु ही नाराजी थेट पालकमंत्र्यांकडून दूर केली जात आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची नावे आज जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या यादीत कोणाचा समावेश होतो कोणाचा पत्ता कट होतो ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तसंच काही इच्छुकांचे पत्ते कट होण्याची शक्यता असल्याने काहींची बंडखोरी टाळण्याच्या दृष्टीने नावे अद्याप जाहीर केली जात नसल्याचे समजते. भाजपा कडून या उमेदवारांची नावे केव्हा जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!