कुडाळ मधून आज एकूण ९२ नामनिर्देशन पत्रांची विक्री

आजच्या दिवसात जि. प. साठी ३१ तर पं. स. साठी ६१ अर्ज
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कुडाळ तहसील कार्यालयातून आज एकूण ९२ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. यामध्ये जिल्हा परिषद साठी ३१ तर पंचायत समितीसाठी ६२ नामनिर्देशन अर्ज विकले गेले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या ५ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्र विक्रीला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. ६ जानेवारीला जिल्हा परिषदेसाठी ५ तर पंचायत समितीसाठी ९ अशा एकूण १४ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली होती. १७ जानेवारीला जिल्हा परिषदेसाठी २३ तर पंचायत समितीसाठी २८ अशा एकूण ५१ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. १८ जानेवारीला सुट्टी होती. आज जिल्हा परिषदेसाठी ३१ तर पंचायत समितीसाठी ६१ अशा एकूण ९२ जणांनी नामनिर्देशन पत्र घेतली. आता पर्यंत जिल्हा परिषदेसाठी एकूण ५९ तर पंचायत समितीसाठी एकूण ९८ अशी एकूण १५७ नामनिर्देशन पत्र विक्रीस गेली आहेत. २१ जानेवारी हा नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी गर्दी होणार आहे.





