पूर्णानंद भवनाचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा करणार

या सोहळ्याच्या नियोजनासाठी कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजाची 19 जानेवारी रोजी बैठक
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील पूर्णानंद भवनांच्या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने एक नुकतीच नियोजनाची बैठक घेण्यात आली. 28 जानेवारी जानेवारी रोजी हा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्याकरता 19 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता पूर्णानंद भवन या ठिकाणी समाज बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 25 जानेवारी रोजी पूर्णानंद भवन या ठिकाणी परिसराची साफसफाई करण्यात येणार असून, या कार्यक्रमाचे नियोजन हे भव्य दिव्य स्वरूपाचे असणार आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच मंडळींनी 19 तारीख च्या नियोजन बैठकीवेळी उपस्थित राहून आपल्या संकल्पना व नियोजनात तसेच 25 रोजी होणाऱ्या साफसफाई मोहिमेमध्ये देखील सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुरेश सामंत व कार्यवाह कमलाकर महाजन यांनी केले आहे.





