विकास निधीची किमया न्यारी, आमदार नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा सिलसिला भारी

चाफेड मधील शेकडो ग्रामस्थ भाजपामध्ये
आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून तसेच कणकवली मतदार संघासाठी आलेल्या तब्बल 2 हजार 210 कोटींचा निधी पाहिल्यानंतर विकास हे आमदार नितेश राणेच करू शकतात याची खात्री पटल्याने कणकवली मतदारसंघातील अनेक गावांमध्ये भाजपा मध्ये पक्षप्रवेशाचा ओढा सुरू झाला आहे. चाफेड बांदेवाडी मधील नागरिकांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी श्री.संदीप साटम, सुभाष नार्वेकर, राजेंद्र शेटे, अमित साटम, गणेश तांबे, सुनील कांडर, सत्यवान भोगले, सिद्धेश भोगले, मयुरेश मिराशी, विशाल राणे, सुहास राणे उपस्थित होते
या प्रवेशामुळे संपूर्ण चाफेड गावच भाजपमय झाले आहे. आमदार नितेश राणे यांनी आपण विकासाच्या प्रवाहात सामील झाला आहात अशा शब्दात सर्व नागरिकांचे भाजपमध्ये स्वागत केले आहे.
देवगड प्रतिनिधी