वर्षा कुडाळकर यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

पिंगुळी – तेंडोली शिवसेनेचे गड असून डावलले

जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय

शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला जिल्हा प्रमुख आणि व्हिजेएनटीच्या जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. आमदार निलेश राणेंबद्दल आणि काही पदाधिकाऱ्याबाबद्दल नाराजी नसली तरी स्थानिक पातळीवर काम करताना घुसमट होत होती. तसेच तेंडोली आणि पिंगुळी हे शिवसेनेचे बालेकिल्ला असताना भाजपला हे मतदारसंघ सोडल्याने राजीनामा देत असल्याचे वर्षा कुडाळकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. तेंडोली जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसनेच्या माजी जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी आज आपल्या घरी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला सोडचिट्ठी देण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्या म्हणाल्या, शिवेसना शिंदे गट स्थापन होताना त्या पक्षात प्रवेश करणारी मी एकमेव महिला पदाधिकारी होते. मी कोणी सामान्य कार्यकर्ता नव्हते तर तर अनेक पदांवर मी काम केली होती. शिवसेनेची सगळी पदं म्हणजे उपविभाग विभाग प्रमुख, तालुका आणि उपजिल्हाप्रमुख एवढी पद होती. जेव्हा मी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा माझ्याकडे जिल्ह्याचे पद दिलं गेलं. तिथे कार्यरत असताना माझ्याकडे कुडाळ मालवण सह कणकवली, देवगड, वैभववाडी, देवगड हे पाच तालुके होते. पाचही तालुक्यात माझे संघटना वाढवण्याचे काम मी प्रामाणिकपणे केले होते.
आत्ताच्या घडीला विचार करता आम्हाला असं वाटतं कि येथे काम करायला खरच काही वाव मिळत नाही. माझी कोणाबद्दलही तक्रार नाही. आमदार निलेश राणे साहेबांच्या बद्दल मला खूप अभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे. पण येथे स्थानिक पातळीवर काम करण्याला वाव मिळत नाही. संघटना वाढीसाठी आम्हाला विचारात घेतले जात नाही. मी संघटना वाढवण्यासाठी मला खूप प्रयत्न करत केले. अजून प्रयत्न करायचे होते. पण येथे नेहमीच मानसिक त्रास झाला. त्याच्यामुळे मी या पक्षातून आणि पदावरून मी निवृत्त होण्याचं ठरवलेलं आहे.
हे पूर्वीच मी ठरवलेलं होतं पण आत्ताची वस्तूस्थिती पाहता होऊ घातलेल्या निवडणुकीत जो फॉर्मुला ठरवला गेला त्यासाठी सुद्धा मी नाराज आहे. कारण तेंडोली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तसाच पिंगुळी हा सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना तिथे भाजपला सीट सोडली गेली आणि त्याच्यामुळे मी नाराज आहे. ह्या सगळ्या कारणामुळे मी आज पक्षातून शिंदे गट शिवसेनेमधून मी आज बाहेर पडत आहे. त्याचबरोबर माझ्याकडे असलेलं ओबीसीच जिल्हाप्रमुख पद त्याचाही मी राजीनामा देत आहे.
ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली त्यांचे मी आभार मानते. जेव्हा मी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा कुडाळ तालुक्यातील ७८ गावातून मी प्रवेश करणारी एकमेव महिला होती. माझ्या या प्रवासात बनवण्याचे सिताराम चव्हाण, माड्याच्या वाडीचे श्री. गडकरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मला सहकार्य केलं त्यांची मी खरंच मनापासून ऋणी आहे. तसंच माझ्याकडे जिल्ह्याचे पद निभवताना खारेपाटणचे श्री. गुरव, देवगडचे श्री. साळसकर आणि कार्यकर्ते, सगळे तालुकाप्रमुख, मालवणचे बबन शिंदे, राजा गावकर, विश्वास गावकर तसेच महिलांमध्ये नीलम शिंदे , सरिता राऊत अशा सगळ्या महिला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं आणि संघटना वाढीसाठी मदत केली. त्यांची मी कायमची ऋणी आहे.

तेंडोलीतुन अपक्ष लढणार

राजीनामा दिल्यानंतर सध्यातरी दुसऱ्या कोणत्या पक्षामध्ये जाण्याचा विचार नाही. सध्या मी जिल्हा परिषदेची निवडणूक तेंडोली मतदार संघातून अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे वंश कुडाळकर यांनी शेवटी सांगितले.

error: Content is protected !!