नांदगाव मोरयेवाडी येथील प्रभाकर (भाऊ) मोरये यांचे निधन

नांदगाव मोरयेवाडी येथील प्रभाकर (भाऊ) मोरये यांचे निधन
कणकवली तालुक्यातील नांदगाव मोरये वाडीतील काजू व लाकूड व्यापारी प्रभाकर (भाऊ) रामचंद्र मोरये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ७० वर्षांचे होते . माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती तथा काँग्रेसचे प्रदेश सहकार सरचिटणीस नागेश मोरये यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, नातवंडे, भाऊ, भावजय, पुतणे,जावई असा मोठा परिवार आहे.