मसुरकर की नही रस्त्याच्या खड्ड्यांमधून अडथळ्याच्या शर्यतीचे आयोजन करणार

मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते करणार स्पर्धेचे उद्घाटन
सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांचा टोला
कणकवली नगरपंचायत मध्ये मागील दहा वर्षे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांन कडून कणकवली शहराच्या विकासाची धूळ फेक चालू आहे. पाच वर्षा पूर्वी मी आणि स्थानिक महिला यांनी आवाज उठवला आणि मसुरकर किनई रस्ता दुरुस्ती काम मंजूर करण्यात आले. 1 कोटी 25 लाख खर्चून रस्ता तयार केला .किनई रस्त्या साठी स्थानिक जमीन मालकांनी विकासासाठी आपल्या जमिनी दिल्या. परंतु त्याच रहिवाशांना आज रस्त्याचा मनस्ताप होत आहे. किनई रस्ता हा एस एम हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांना रहदारीचा रस्ता पण आहे.आणि अशा खड्डेमय रस्त्यामुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासन घेणार का. असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांनी उपस्थित केला आहे.
मध्यंतरी गणपती चतुर्थी आधी तत्कालीन मुख्याधिकारी यांनी हा रस्ता दुरुस्ती करून घेतो सांगितले होते.
परंतु भर पावसात रात्रीच्या अंधारात रस्त्याची मलमपट्टी करत डागडुजी करून घेतली.
आता महिन्याभरात पुन्हा रस्त्याची अजून दुर्दशा झाली आहे. नगर पंचायत प्रशासन ठेकेदारास का पाठीशी घालत आहे याचे कोडे न सुटण्यासारखे आहे.
परंतु आता जनतेचा संयम सुटला आहे. त्यामुळे जनतेच्या पाठिंब्याने लवकरच अडथळ्यांच्या शर्यतीचे आयोजन करून मुख्याधिकारी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल. अशी माहिती श्री जाधव यांनी दिली.