खारेपाटण चेकपोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथक (SST) कार्यरत

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे शासनाच्या वतीने स्थिर सर्वेक्षण पथक कार्यरत ठेवण्यात आले असून निवडणुकीच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या -जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
खारेपाटण चेकपोस्ट येथे सलग तीन सत्रात कार्यरत असलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाचे प्रमुख श्री सुजण दळवी,बी.जी कुमावत, विशाल शिंदे असून त्यांना सहाय्यक कर्मचारी म्हणून या पथकात दिग्विजय पवार,गजानन पवार, कॅमेरामन संदीप कांबळे,पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत राठोड,पोलीस शिपाई रोहिदास लांडगे यांचा समावेश आहे.
तसेच या स्थिर सर्वेक्षण पथकाला खारेपाटण पोलीस दूरशेत्र चेकपोस्ट चे पोलीस नाईक श्री चंद्रकांत माने पोलीस – पराग मोहिते यांचे देखील सहकार्य मिळत आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ते निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होई पर्यंत हे स्थिर सर्वेक्षण पथक कार्यरत राहणार असून सकाळी ६ ते दुपारी २ तसेच दुपारी २ ते रात्री १० व रात्री १० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत तीन पाळ्यामध्ये हे कर्मचारी स्थिर सर्वेक्षण पथकात कार्यरत राहणार आहेत.या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या वतीने जिल्ह्यात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची कसूण तपासणी करण्याचे काम सुरू आहे.