कुडाळात १२ मार्चला शिशु मेळावा
सुशीला शिशुवाटीका हिंदू कॉलोनी-कुडाळ यांचे आयोजन
निलेश जोशी । कुडाळ : सुशीला शिशुवाटीका हिंदू कॉलोनी-कुडाळ यांच्या वतीने रविवार दिनांक १२ मार्च रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत शिशु मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांचा सर्व अंगानी शैक्षणिक विकास कसा होईल याबाबत यावेळी माहिती देण्यात येणार आहे. शिशु शिक्षणासंबंधी आवड असलेले पालक आणि शिशु यांनी उपस्थित राहावे असे आवाहन विद्याभारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर प्रभू देसाई आणि शिशु वाटिका प्रमुख श्रीमती विजया रामाणे तसेच सहकाऱ्यांनी केले आहे.
भारतीय पद्धतीच्या शिक्षणाचा सिंधुदुर्गात सुरु असलेला प्रयोग पाहण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक प्रगती म्हणजे केवळ बौद्धिक विकास नव्हे. केवळ लेखन, वाचन नव्हे. पूर्व प्राथमिक शिक्षणात प्रयोगशाळा, स्वयंपाकघर, चित्रशाळा, कलाशाळा, कार्यशाळा, रंगमंच, बाग, प्रदर्शनी, तरण तलाव, प्राणी संग्रहालय, क्रीडांगण आदींचा वापर करून पूर्व प्राथमिक शिक्षण दिल्यास सर्व अंगानी शैक्षणिक विकास कसा होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी या शिशु मेळाव्याला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. सुशीला शिशु वाटिका, हिंदू काँलनी कुडाळ येथे हा शिशूमेळावा होणार आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.