तबला वादन उपक्रम अखंडित राहण्याची जबाबदारी विद्यार्थी व पालकांची ; चारुदत्त फडके
पं. जितेंद्र अभिषेकी सघनगान शिक्षण केंद्रातर्फे आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात तबला वादन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सायंकाळी चारुदत्त फडके यांचे एकल तबलावादन,लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन
तबला वादन ही कला आहे. ही कला शिकण्यासाठी जिद्द, इच्छशक्ती व मेहनत घ्यावी लागते. ही कला शिकणाऱ्यांसाठी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षक केंद्रातर्फे तबला वादनाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. आचरेकर प्रतिष्ठानचा हा उपक्रम अखंडित राहण्याची जबाबदारी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची आहे, असे प्रतिपादन तालयोगी पं. सुरेश तळवळकर यांचे शिष्य चारुदत्त फडके यांनी केले. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पं. जितेंद्र अभिषेकी सघनगान शिक्षण केंद्रातर्फे आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात तबला वादन प्रशिक्षण आयोजित केले आहे. याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित, कार्याध्यक्ष अँड.एन आर देसाई, बाळ नाडकर्णी विश्वस्त समीर नवरे, सीमा कोरगावकर, लीना काळसेकर,मनोज मेस्त्री आदी मान्यवर विद्यार्थी पालक उपस्थित होते. वामन पंडित म्हणाले, १९८२ साली वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची स्थापना झाली. या संस्थेतर्फे गेली अनेक वर्षे या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्योत्सव, एकांकिका स्पर्धेसह विविध उपक्रम राबविले जात आहेत. कणकवलीकरांच्या पाठबळावर ही संस्था वाटचाल करीत आहे. संस्थेने यापूर्वी शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्यांना त्याचे ज्ञान व प्रशिक्षण मिळावे यासाठी पं.
पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षण केंद्र सुरु केले असून यांतर्गत आता तबला वादन प्रशिक्षण दिले जात आहे. हे उपक्रम राबवणे कठीण असले तरी संस्था राबवित आहे, ही तुम्हा आमच्यासाठी कौतूकाची बाब आहे. तबला वादनाची आवड असणाऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन या कलेत पारंगत व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मान्यवरांचे स्वागत ॲड.एन आर देसाई यांनी केले. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील २० हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दरम्यान, सायंकाळी चारुदत्त फडके यांचे एकल तबलावादन होणार आहे. याचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
कणकवली / प्रतिनिधी