आचरा येथे २६सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा


आचरा
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक २६सप्टेंबर रोजी रात्रौ ठिक ९.वाजता देवूळवाडी मित्र मंडळ पुरस्कृत जिल्ह्यास्तरीय भव्य खुली फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी प्रथम पारितोषिक रुपये ७००१व चषक, द्वितीय पारितोषिक रुपये ५००१व चषक तृतीय पारितोषिक रुपये ३००१व चषक असून उत्तेजनार्थ प्रत्येकी रुपये १०००दिले जाणार आहेत.प्रथम येणाऱ्या सात संघानाच प्राधान्य दिले जाणार आहे.सादरीकरणासाठी वेळ २५ मिनिटे असून .अधिक माहिती साठी अर्जुन बापर्डेकर ९४२००८२३२० यांच्या शी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!