निर्माल्यापासून ४५० किलो कंपोस्टची निर्मिती

श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम;३०० झाडेही लावली

✅प्रतिनिधी l दोडामार्ग
श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने श्रीगणेश चतुर्थीनिमित्त जमा केलेल्या निर्माल्यापासून कंपोस्टखत निर्मिती करण्याचा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्र‌माअंतर्गत बांदा – आळवाडी तेरेखोल नदीकाठी तसेच शेर्ले नदीकाठी निर्माल्य संकलन करण्यात आले.बांदा येथील श्री समर्थ बैठक सभागृहात निर्माल्यापासून कंपोस्ट खत बन‌विल्याचा उपक्रम राबविण्यात आला. निर्माल्य संकलन व कंपोस्ट खत बनविण्याच्या उपक्रमात ९४ श्रीसदस्य उपस्थित होते व एकूण ४५० किलो कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात आली. प्रतिष्ठानच्या वतीने डिंगणे गाव, डोंगरपाल येथील हाय‌स्कूलच्या परिसरात ३०० वृक्षांची लागवड करण्यान आली. वृक्षारोपण करण्यात आलेल्या या वृक्षांचे दर रविवारी संगोपन व संवर्धन श्री बैठकीतील श्री सदस्य करत आहेत.
डॉ श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता.अलिबाग जि. रायगड यांच्यावतीने पद्‌मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने श्री बैठकीच्या माध्यमातून सामाजिक व
पर्यावरणपूरक असे विविध उपक्रम जिल्हा, राज्य, देश व परदेशातही राबविले जातात.

error: Content is protected !!